युरोपमध्ये गुराढोरांना तोंड, पायाचे आजार   

देशांच्या सीमा सील होणार; सामूहिक कत्तलीची भीती

बुडापेस्ट : मध्य युरोपमध्ये गुराढोरांना तोंड आणि पायाचे आजार वाढले आहेत. त्याचा प्रादूर्भाव वाढू नये, यासाठी अनेक देशांनी सीमा सील करण्याबरोबरच जनावरांच्या सामूहिक कत्तलीची शक्यता वर्तविली जात आहे.
 
वायव्य हंगेरीत मार्चच्या सुरुवातीला तीन गुरांच्या छावणीत अशा आजाराची नोंद प्रथम झाली होती. दोन आठवड्यानंतर जवळच्या स्लोव्हाकियात वेगाने विषाणू पसरला असून तेथील गुरांमध्ये आजाराची लक्षणे दिसून आली. हंगेरी आणि स्लोव्हाकियातील गुरांच्या प्रत्येकी तीन छावण्यात आजार पसरल्याचे दिसून आले. त्यामुळे शेतकरी चिंतेत पडले आहेत. सीमावर्ती भागातील देशांत तो पसरू नये, यासाठी आता काळजी घेण्याची गरज व्यक्त केली जात आहे. पर्यायाने देशांच्या सीमा बंद करण्याबरोबर सुरक्षेच्या दृष्टीने गुराढोरांची सामूहिक कत्तल करण्यापर्यंत मजल जाण्याची भीतीही स्थानिक उद्योजक आणि शिकारी सँडोर स्झोबोस्झ्ला यांनी व्यक्त केली जात आहे. ते म्हणाले, आजाराचा प्रादूर्भाव वाढला तर सुमारे ३ हजार जनावरांची कत्तल करावी लागेल. 
 
आजार काय आहे?
 
गुराढोरांच्या तोंडाला आणि पायाला अशा प्रकारचे आजार होतात. प्रामुख्याने शेळ्या, मेंढ्या, डुक्करे आणि हरिणांना अशा आजाराची लागण होते. त्यांना ताप येतो आणि तोंडातून लाळ अधिक गळते. आजार संसर्गजन्य असतो. आजाराचा विषाणू  एका जनावराकडून दुसर्‍याकडे कापड, त्वचा आणि वाहनांच्या माध्यमातून पसरत जातो. आता हंगेरी सरकारकडून आजाराचा प्रादूर्भाव वाढू नये, यासाठीं काळजी घेतली जात आहे. ज्या ठिकाणी आजार वाढला आहे तेथून संसर्ग वाढीस लागू नये, यासाठी पावले उचलली आहेत. ठिकाणांवरील प्रवेशद्वारे निर्जंतुकीकरण करण्यावर भर दिला जात आहे. 

Related Articles